विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा / विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा

विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा / विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा प्रतिनिधी Sep 30, 2015, 04:05 PM IST अमरावती - आश्रमशाळेतील विविध समस्यांना घेऊन फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आज (२९ सप्टेंबर) शाळा भरवली. शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागल्याचे फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी त्यांच्या कक्षातून खाली येत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील आदिवासी फासेपारधी सुधार समितीमार्फत प्रश्नचिन्ह आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळेला १८ जुलै २०१४ च्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत आश्रमशाळेत ४४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत ते १० वर्ग असून, शिक्षण घेण्यासाठी इमारत न...