Posts

Showing posts from March 21, 2021

मिती गृप व बाविस्कर गृप ऑफ कंपनीज तर्फे ऑनलाईन कार्यक्रमांतर्गत अभिमान महाराष्ट्राचा सन्मान: मतिन भोसलेनी साधला संवाद.

Image

*फासेपारधी मुलांच्या खडतर प्रवासाचे ‘‘प्रश्नचिन्ह...''*

Image
* फासेपारधी मुलांच्या खडतर प्रवासाचे ‘‘प्रश्नचिन्ह...''* आज ही चोरांची जमात म्हणजे फासेपारधी अशीच त्यांची ओळख समाजात आहे. या समाजातील मुलांसाठी शिक्षण हा तरणोपाय असल्याचे लक्षात घेऊन सुरू झाली झोपड्यातली शाळा ‘प्रश्नचिन्ह'. समाजापुढे पोटाचा प्रश्न, गावाचा प्रश्न, घराचा प्रश्न, जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न, विविध दाखल्यांचा प्रश्न, माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न... प्रश्न, प्रश्न, प्रश्न! प्रश्न प्रश्न!! म्हणून त्या शाळेचे नाव प्रश्नचिन्ह. पण याच प्रश्नचिन्हने आकार घेतला.  समाजातील ४५५ मुले येथे शिकत आहेत. अनेकदा सूर्य डोईवर घ्यावा लागला. मतीन भोसलेनं हे धनुष्यबाण पेललं. शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिल्यावर कुटुंबियांनी बोलणे बंद केले. पत्नीही विरोधात गेली. घरातील संघर्षाला दोन महिने तोंड दयावे लागले. आता पत्नी सीमाही त्याच्या खांद्याला खांदा लावून सोबत करतेय. हा प्रवास सोपा नव्हता, अजुनही नाही. या प्रवासात प्रश्नचिन्हला समृध्दीचा महामार्ग आडवा आला आहे. इतक्या वर्षांची मेहनतीने मिळालेल्या समृध्दीवर महामार्गासाठी पाणी सोडावं लागतयं. पुन्हा त्या मुलांसाठी संघर्ष कर...