प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचे प्रश्न मुख्यमंत्रीच्या दारी





 

प्रश्नचिन्ह शाळेची अस्तित्वासाठी धडपड*

*मतीन भोसले व सहकारी करत आहेत आमरण उपोषण*

*शासनाची समृद्धी प्रश्नचिन्ह च्या मुळावर*

प्रश्नचिन्ह ही *450 फासेपारधी मुले* असलेल्या शाळेचा परिसर 3 एकर आहे. शाळेला कोणतीही *शासकीय मदत नाही*.लोकसहभागातून शाळा सुरू आहे. सिग्नलवर/मंदिरात भीक मागणारे,छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारे,शिकार करणारे,कचरा/प्लॅस्टिक वेचनारे मुले पूर्ण महाराष्ट्र, आंध्र, छत्तीसगड या भागातून गोळा करून ही शाळा सुरू केली. शाळेला इमारत नाही,खायची व्यवसथा नाही,पुस्तके/शिक्षक नाही,पाणी नाही असे सर्वच प्रश्न म्हणून शाळेचे नाव प्रश्नचिन्ह असे ठेवले. *मतीन भोसले* यांनी शिक्षकाची नोकरी सोडुन हे कार्य सुरू केले. किरायाच्या *गोडाऊन मध्ये व तट्टे/पत्रे* असलेल्या खोल्यात मुले रहायची व शाळा भरायची.सुट्टीच्या दिवशी आजूबाजूच्या गावात शिक्षक व विद्यार्थी भीक मागायला जात असत व जे मिळेल ते खाऊन रहात असत. कधी नाही मिळाले तर *भात किंवा ते ही नसेल तर पिठाची नुसती पेज*. पण *मैत्र मांदियाळी* ने भीक मांगो आंदोलन थांबवले. बरेच जण मदतीसाठी पुढे आले. आता हळूहळू प्रश्न मिटतील असे वाटत असतानाच *शाळेच्या अस्तित्वाचाच प्रश्न* निर्माण झाला.

शाळेच्या बरोबर मधुन *समृद्धी महामार्ग* जात आहे. मुले रहात असलेली इमारत वाचत आहे पण *तात्पुरती उभारलेली शाळा, वाचनालय, 2 विहिरी, बोअरवेल यात जात आहे* व काहीच जागा उरत नाही.

त्यामुळे शाळेच्या बाजूला असलेली *शासनाची ई-क्लास जमीन व योग्य तो मोबदला* देण्यात यावा ही माफक अपेक्षा.

*मागे काही महिन्यांपूर्वी *मा.मुख्यमंत्री महोदय* यांना भेटले असता पूर्ण शाळेचे पुनर्वसन करू असे सांगितले*

*महामार्गचे अधिकारी म्हणतात की मागण्या मान्य करू पण लेखी देण्यास तयार नाहीत*

*क्लेकटर सर म्हणतात की आम्हाला वरतून काही आदेश नाहीत*

*महामार्गचे मुख्याधिकारी म्हणत आहेत की कलेक्टर ने प्रस्ताव पाठविला तर आम्ही लगेच मान्य करू*

अशी *टोलवाटोलवी* चालू आहे. त्यामुळे मागण्या मान्य होऊन शाळा वाचावी यासाठी मतीन भोसले व त्यांचे सहकारी *आमरण उपोषण* करत आहेत.

*आपणही त्यांना पाठिंबा देऊ व त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे यासाठी शासनास विनंती*

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .