वित्तमंत्री मुनगंटीवार साहेब यांच्या दालनात फासेपारधी समाजाच्या समस्या
फासे पारधी समाजाची पहिली बैठक दि. 14/06/2019 ला सह्याद्री सभागृह मुंबई येथे सभा भरविण्यात आली होती. या सभेला मा. मुनगंटीवार (वित्त मंत्री ), महसूल सचिव, आदिवासी उपसचिव, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत आदिवासी फासे पारधी समाजाच्या विकासासाठी काही मागण्या या सभेत केल्या होत्या. आणि त्या खालीलप्रमाणे आहेत.
1)फासे पारधी समाज वास्तव्य करून राहत असलेल्या प्रत्येक बेडा वस्तीतील कुटुंबाना जागेचा नमुना 8अ उपलब्ध करून देणे.
2) प्रत्येक फासे पारधी कुटुंबाना घरकूल उपलब्ध करून देणे.
3) फासे पारधी समाजाच्या कुटुंबांनी जेथे -जेथे गायरान जमीन, इ -क्लास जमीन किंवा वनविभागाची जमीन यावर अतिक्रमण करून शेती करत असेल, त्यांना शेतीचे पट्टे देण्यात यावेत.
4) प्रत्येक फासे पारधी बेड्यावर 15लाख रु. गुंतवणूक करून 1 वाचनालय उभारून देणे.
5) फासे पारधी समाजाच्या सुशिक्षित मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात यावे.
6) बचत गटाला प्रशिक्षण दिल्यानंतर 15लाख देण्यात यावे.
इ. अशा एकोणवीस मुद्दयांवर चर्चा करण्यात आली होती. या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे कबूल केले आहे. तरी सर्व फासे पारधी समाजाला की, वरील विषयाच्या बाबतीत आपल्याकडे उपलब्ध पुरावे गोळा करावे. पुढील आठवड्यात औरंगाबाद येथे बैठकीचे आयोजन करून तेथे आपले प्रस्ताव सादर करायचे आहेत तेव्हा या बाबींची दक्षता घ्यावी .
Comments
Post a Comment