अंधार यात्रेची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हा प्रशासन यंत्रणेची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

*अंधार यात्रेची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हा प्रशासन यंत्रणेची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.* जीथे दिवाळी सना निमित्ताने ०३/११/२०२१ ला संपूर्ण देश दिप लावून अंधकार दूर करत होता, तीथेच शेकडोंच्या संख्येत आदिवासी फासेपारधी समाज दिवाळीच्या दिवशी २० कि.मी पायदळ अंधार यात्रा जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयावर आदिवासी फासेपारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष *मतिन भोसले* यांच्या नेतृत्त्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन करत होता. या अंधार यात्रेची यवतमाळ जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत काल १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेत सर्व संबंधित जिल्हा प्रशासकीय अधिकारी यंत्रणा _( उपजिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व म.रा. वि.वि.क, आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी पुसद व पांढरकवडा प्रकल्प कार्यालय, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सर्व उपविभागीय अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गट...