दिवाळी सणानिमित्त प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना तर्फे दिवाळी फराळ, मिष्ठान्न व कपडे वितरण उपक्रम संपन्न

#प्रश्नचिन्हाची_दिवाळी_झाली_गोड. दर वर्षी प्रमाणे यंदाही आज रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना चे अध्यक्ष- श्री.अजयजी किंगरे सर व सहयोगी सामाजिक कार्यकर्ते यांनी #यांचीही_दिवाळी_गोड_करूयात #मदतीचे_आवाहन_वंचितांसाठी_दिवाळी_फराळ- मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान,जालना या सामाजिक उपक्रम अंतर्गत प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा, मंगरुळ चव्हाळा आश्रमशाळाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक प्रमाणे दिवाळी फराळ व मिष्ठान्न ची किट सह नवीन कपडे वितरीत करण्यात आले. दर वर्षी प्रमाणे यंदाही मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना तर्फे आयोजित दिवाळी पुर्व फराळ व कपडे वाटप या कार्यक्रमाची सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. सदर कार्यक्रम संपन्न झाला असता सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर स्मित हास्य व वेगळाच आनंद व जल्लोष दिसायला मिळाला. तत्पूर्वी ...