कुबेर फेसबुक गृप वर्धा तर्फे प्रश्नचिन्हास सदिच्छा भेट

आज दि. २३/११/२०१९ ला "कुबेर फेसबुक" गृपच्या सर्व मेंबर्सनी प्रश्नचिन्हास सदिच्छा भेट देत प्रश्नचिन्ह प्रकल्पा बद्दल सद्भावना दाखवत धान्य व शैक्षणिक साहित्ये भेट स्वरूपात देणगी दिली.
नमस्कार , मी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मं.च च्या सौजन्याने आपणास फासेपारधी समाजातील कचरा-भंगार गोळा करणारी, भीक मागून, शिकार करून खाणारी,पाकीटमारी-चोऱ्या करणारी मुलं अशा गरीब वंचित मुलांना स्वावलंबाने व सक्षम जीवन जगता यावं या अनुषंगाने प्रश्नचिन्हाचे स्थापना करण्यात आली आहे तरी या संदर्भात आमच्या मुलांना संगोपनासह सामाजिक व शैक्षणिक न्याय मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्नांची सर्व उपक्रमाची संपूर्ण माहिती संकलित करून आपल्या सामोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.