प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचा ११वा वर्धापनदिन सोहळा संपन्न

आज २२ सप्टेंबर रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा चा ११वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या * पहिल्या सत्राला * प्रमुख पाहुणे म्हणून - * मा.श्री. टि.एस भाल साहेब ( निवृत्त अतिरीक्त पोलिस महासंचालक) * उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी - * ऍड. वामनराव चटप ( नेते, शेतकरी संघटना) * , कार्यक्रमाचे उद्घाटक- * मा. भिमराव पांचाळे (सुप्रसिद्ध मराठी गझलकार) * विशेष अतिथी- * मा. सत्यपाल महाराज( (राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक) * यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले सत्र पारपडले. वर्धापनदिन च्या * दुसऱ्या सत्राला * कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी - * मा. पांढरपट्टे साहेब ( विभागीय आयुक्त, अमरावती विभाग) * यांची स्नेह भेट दिली सदर प्रसंगी प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती आदिवासी फासेपारधी सुधार समिती चे अध्यक्ष * मा. मतिन भोसले * यांनी दिली तसेच मा. विभागीय आयुक्त साहेबांना आदिवासी फासेपारधी समाजाच्या विविध स्थानिक समस्या शाळेचे मुख्य प्रश्न मांडण्यात आले. ...