माजी खासदार अनंत गुडे साहेबांची प्रश्नचिन्हास सदिच्छा भेट

आज दि१४/१२/२०१९ रोजी माजी खासदार अनंत गुडे साहेबांनी आपल्या कार्यकर्तां सोबत प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी प्रश्नचिन्हाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रश्नचिन्हाचे संस्थापक अध्यक्ष श्री.मतीनजी भोसले यांनी अनंत गुडे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . अनंत गुडे साहेबांनी ' आपण प्रश्नचिन्हाचा समस्या महाविकासआघाडी सरकार समोर मांडु व मा. मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देत सर्वस्व पुर्नवसन करत १० एकर जमीन प्रनश्नचिन्हास उपलब्ध करून द्यावी या साठी व्ययक्तीरित्या करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.