Posts

Showing posts from November 10, 2019

तुमचा मदतीचा एक हात देऊ शकतो त्यांना संन्मानाचे जीवन

Image
तुमचा मदतीचा  एक हात  देऊ शकतो त्यांना संन्मानाचे जीवन.

डॉ.आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा तर्फे प्रश्नचिन्हास शाळाभेट..

Image
डॉ.आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा चे शाळा भेटीसाठी आलेल्या शिक्षक व विद्यार्थी सह प्रश्नचिन्हातील प्रा. मुख्याध्यापक मा. ओमकार पवार सर व माध्यमिक मुख्याध्यापक- मा. प्रशांत  गोरामन सर व शिक्षक वृंद. आज दि. १५/११/२०१९  क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती दिनी डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क,वर्धा महाविद्यालय तर्फे डॉ.खेडकर सर व डॉ. विजेता मॅडम च्या  नेतृत्वाखाली त्यांच्या महाविद्यालयातील  BSW- अंतिम वर्षातील ४१ विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेला भेट देण्यात आली. याप्रसंगी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा बद्दल सविस्तर माहिती मुख्याध्यापक श्री. ओमकार पवार सर व मुख्याध्यापक श्री.प्रशांत गोरामन सरांनी दिली.

प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा माहितीपत्रक

Image
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या  रोजच्या खाण्याचा प्रश्न तर गंभीर आहेच पण इतरही अनेक प्रश्नांचा सामना करत यशस्वी वाटचाल चालू आहे. गरज आहे आपल्या सहकार्याची..! एकदा अवश्य भेट द्या... संपर्क-          संस्थापक श्री. मतीनजी भोसले ९०९६३६४५२९.

समस्येला उत्तर देणारं ‘प्रश्नचिन्ह’

Image
समस्येला उत्तर देणारं ‘प्रश्नचिन्ह’ BOI Follow   Add Bookmark Wednesday, November 08 | 03:45 PM गुन्हेगारी, अज्ञान आणि गरिबी यांच्या गर्तेत फसलेल्या फासेपारधी समाजातील मुलांच्या अंधकारमय स्थितीने अस्वस्थ झालेल्या याच समाजातील  मतीन भोसले  या संवेदनशील, सुशिक्षित तरुणाने या समाजातील मुलांचे भविष्य बदलण्यासाठी अमरावतीत मंगरूळचव्हाळा येथे  ‘प्रश्नचिन्ह’  नावाची संस्था उभारली आहे. त्यामुळे भीक मागून किंवा रानोमाळ फिरून पोट भरणाऱ्या मुलांच्या मनात स्वप्नांचे धुमारे फुटले आहेत.  ‘लेणे समाजाचे’ मध्ये आज पाहू या समस्येचे उत्तर शोधणाऱ्या ‘प्रश्नचिन्ह’ या आश्रमशाळेविषयी... ............ समाजातील दांभिकपणाबद्दल प्रश्न विचारणारी ‘प्रश्नचिन्ह’ ही संस्था माणुसकीला जणू पाझर फोडू पाहत आहे. फासेपारधी ही गुन्हेगारीचा शिक्का बसलेली जमात. त्यामुळे या समाजातील लहान मुलांना शाळा माहीतही नाही. अनेक मुलांचे वडील तुरुंगात असतात. ही मुले रेल्वेस्थानके, सिग्नलवर भीक मागून आपले आणि कुटुंबाचे पोट भरतात. हे बघून अस्वस्थ होत असलेल्या मतीन भोसले या तरुणाने ‘आदिवास...

मतीन भोसले यांच्या प्रनश्नचिन्ह आश्रमशाळेसमोर " प्रश्नचिन्ह "

Image
मतीन भोसले यांच्या प्रनश्नचिन्ह आश्रमशाळेसमोर " प्रश्नचिन्ह " अमरावती ः फासे पारधी समाजाची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या मतीन भोसले यांचा संघर्षाशी सामना अद्यापही संपलेला नाही. समृद्धी महामार्गात त्यांची आश्रमशाळा जात असल्याने प्रश्‍नचिन्ह शाळेच्या समोर आता पुनर्वसनाचे नवे प्रश्‍नचिन्ह लागले आहे. समृद्धी महामार्गाच्या कामात फासेपारधी समाजाच्या मुलांची ही शाळा जाऊ नये, यासाठी मतीन भोसले यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. आंदोलने झाली, निवेदने देण्यात आली; मात्र शासनाने अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. नवी आश्रमशाळा बांधण्यासाठी पर्यायी जागा देण्याचे आश्‍वासनसुद्धा मतीन भोसले यांना सरकारच्या वतीने देण्यात आले. मात्र, हे आश्‍वासनदेखील अद्याप पाळण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे प्रचंड मेहनतीने उभारलेली ही शाळा जाणार, या कल्पनेनेच येथील मुलांच्याच काय तर मतीनचा आजवरचा संघर्ष पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. अमरावती जिल्ह्यातील नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यातील मंगरूळ चव्हाळा येथे मतीनने प्रश्नचिन्ह निवासी आश्रमशाळा उभा...