Posts

दिवाळी सणानिमित्त प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना तर्फे दिवाळी फराळ, मिष्ठान्न व कपडे वितरण उपक्रम संपन्न

Image
#प्रश्नचिन्हाची_दिवाळी_झाली_गोड. दर वर्षी प्रमाणे यंदाही आज रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना चे अध्यक्ष- श्री.अजयजी किंगरे सर व सहयोगी सामाजिक कार्यकर्ते यांनी #यांचीही_दिवाळी_गोड_करूयात #मदतीचे_आवाहन_वंचितांसाठी_दिवाळी_फराळ- मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान,जालना या सामाजिक उपक्रम अंतर्गत प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा, मंगरुळ चव्हाळा आश्रमशाळाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक प्रमाणे दिवाळी फराळ व मिष्ठान्न ची किट सह नवीन कपडे वितरीत करण्यात आले.            दर वर्षी प्रमाणे यंदाही मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना तर्फे आयोजित दिवाळी पुर्व फराळ व कपडे वाटप या कार्यक्रमाची सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते.             सदर कार्यक्रम संपन्न झाला असता सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर स्मित हास्य व वेगळाच आनंद व जल्लोष दिसायला मिळाला. तत्पूर्वी ...

प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचा ११वा वर्धापनदिन सोहळा संपन्न

Image
आज २२ सप्टेंबर रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा चा ११वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या  * पहिल्या सत्राला *    प्रमुख पाहुणे म्हणून - * मा.श्री. टि.एस भाल साहेब ( निवृत्त अतिरीक्त पोलिस महासंचालक) *   उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी - * ऍड. वामनराव चटप ( नेते, शेतकरी संघटना) * , कार्यक्रमाचे उद्घाटक- * मा. भिमराव पांचाळे (सुप्रसिद्ध मराठी गझलकार) *   विशेष अतिथी- * मा. सत्यपाल महाराज( (राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक) *   यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले सत्र पारपडले. वर्धापनदिन च्या * दुसऱ्या सत्राला * कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी - * मा. पांढरपट्टे साहेब ( विभागीय आयुक्त, अमरावती विभाग) * यांची स्नेह भेट दिली सदर प्रसंगी प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती  आदिवासी फासेपारधी सुधार समिती चे अध्यक्ष * मा. मतिन भोसले * यांनी दिली तसेच मा. विभागीय आयुक्त साहेबांना आदिवासी फासेपारधी समाजाच्या विविध स्थानिक समस्या शाळेचे मुख्य प्रश्न मांडण्यात आले.     ...

२२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचा ११ वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Image
२२ सप्टेंबर रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा चा ११वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात येत आहे.     तरी सर्व सन्माननीय समाजबांधव-भगिनी सादर आमंत्रित🙏. #२२_सप्टेंबर #वर्धापनदिन #myowncreation  #mydesigns  #Made_by_me

माझा बाप्पा उपक्रम अंतर्गत मुलांनी मातीपासून गणेशमूर्ती तयार केलेत.

Image
आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा येथे श्री गणेश चतुर्थी निमित्ताने 'माझा बाप्पा ' हा उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रम मध्ये विद्यार्थ्यांनी मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. माझा बाप्पा उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी आनंदाने माझा बाप्पा कसा सर्वात उत्कृष्ट व सुंदर होईल याची स्पर्धा रंगली.  मुलांमधील 'बाल मुर्तीकार'  क्रियेटीव्हिटी या उपक्रमाच्या माध्यमातून दिसायला मिळाला.

प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा च्या गुणवंत विद्यार्थ्यांनी वर्ष २०२१-२२ च्या दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवुन उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व या यशात मोलाचा वाटा असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐.

Image
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा च्या गुणवंत विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवुन उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व  या यशात मोलाचा वाटा असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐.

back to school banner

Image

आदिवासी फासेपारधी सुधार समिती द्वारा संचालित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा ला मिळाले 12A, 80G व CSR प्रमाणपत्र. दानदात्यांना मिळणार करामध्ये सवलत.

Image
आदिवासी फासेपारधी सुधार समिती द्वारा संचालित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळाला 12 A, 80 G, व CSR प्रमाणपत्र आयकर विभाग व कार्पोरेट अफेअर मंत्रालयाकडून प्राप्त झाली आहेत.         यामुळे आता प्रश्नचिन्हाच्या दानदात्यांना करात (income tax ) मध्ये सूट मिळणार आहे.