दिवाळी सणानिमित्त प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना तर्फे दिवाळी फराळ, मिष्ठान्न व कपडे वितरण उपक्रम संपन्न

#प्रश्नचिन्हाची_दिवाळी_झाली_गोड.

दर वर्षी प्रमाणे यंदाही आज रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना चे अध्यक्ष- श्री.अजयजी किंगरे सर व सहयोगी सामाजिक कार्यकर्ते यांनी #यांचीही_दिवाळी_गोड_करूयात
#मदतीचे_आवाहन_वंचितांसाठी_दिवाळी_फराळ- मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान,जालना या सामाजिक उपक्रम अंतर्गत प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा, मंगरुळ चव्हाळा आश्रमशाळाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक प्रमाणे दिवाळी फराळ व मिष्ठान्न ची किट सह नवीन कपडे वितरीत करण्यात आले.

           दर वर्षी प्रमाणे यंदाही मैत्री मांदियाळी प्रतिष्ठान जालना तर्फे आयोजित दिवाळी पुर्व फराळ व कपडे वाटप या कार्यक्रमाची सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते.
            सदर कार्यक्रम संपन्न झाला असता सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर स्मित हास्य व वेगळाच आनंद व जल्लोष दिसायला मिळाला.

तत्पूर्वी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साबळे सरांनी केले असुन सुत्रसंचलन श्री.रामप्रसाद क्षिरसागर यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवर सह सर्व शिक्षक वस्तीगृह कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. सोबत दिवाळी सणानिमित्त सुट्ट्या जाहिर करण्यात आल्या.

#मैत्री_मांदियाळी_प्रतिष्ठाण,जालणा.
#खुप_खुप_आभार 
#HappyDiwali

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .