प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचा ११वा वर्धापनदिन सोहळा संपन्न
आज २२ सप्टेंबर रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा चा ११वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या *पहिल्या सत्राला* प्रमुख पाहुणे म्हणून - *मा.श्री. टि.एस भाल साहेब ( निवृत्त अतिरीक्त पोलिस महासंचालक)* उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी - *ऍड. वामनराव चटप ( नेते, शेतकरी संघटना)*, कार्यक्रमाचे उद्घाटक- *मा. भिमराव पांचाळे (सुप्रसिद्ध मराठी गझलकार)* विशेष अतिथी- *मा. सत्यपाल महाराज( (राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक)* यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले सत्र पारपडले.
वर्धापनदिन च्या *दुसऱ्या सत्राला* कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी - *मा. पांढरपट्टे साहेब ( विभागीय आयुक्त, अमरावती विभाग)* यांची स्नेह भेट दिली सदर प्रसंगी प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती आदिवासी फासेपारधी सुधार समिती चे अध्यक्ष *मा. मतिन भोसले* यांनी दिली तसेच मा. विभागीय आयुक्त साहेबांना आदिवासी फासेपारधी समाजाच्या विविध स्थानिक समस्या शाळेचे मुख्य प्रश्न मांडण्यात आले.
तदनंतर प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आदिवासी फासेपारधी समाजाच्या बांधवांना जातीचे दाखले व राशन कार्ड वाटप मा. विभागीय आयुक्त अमरावती यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर सुप्रसिद्ध मराठी गझलकार - मा.श्री. भिमराव पांचाळे साहेब यांच्या अमृतवाणी मध्ये गझल गायन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
Comments
Post a Comment