Posts

प्रसिद्ध फिनिक्स करियर ऍकॅडमी चे संचालक नितेश कराळे सरांची प्रश्नचिन्हाला सदिच्छा भेट.

Image
प्रसिद्ध फिनिक्स करियर ऍकॅडमी चे संचालक ज्यांनी अध्यापन पद्धती मध्ये गावठी रंग देऊन महाराष्ट्रातील युवकांना शिक्षण व परिक्षा च्या पुर्वतयारी ची फेसबुक यु-टूब च्या माध्यमातून मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले असे सुप्रसिद्ध प्राध्यापक- नितेश कराळे सर  यांनी प्रश्नचिन्हा सदिच्छा भेट दिली.  याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपल्या अनोख्या शैलीने शिक्षणा विषयक मार्गदर्शन केले.

बहु चर्चीत 'झुंड' चित्रपट ज्यांच्या जीवनावर साकारला आहे असे विजय बारसे सर प्रशिक्षक स्लम सॉकरचे संस्थापक यांची प्रश्नचिन्हला सदिच्छा भेट.

Image
आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा येथे महानायक अमिताभ बच्चन द्वारा * स्लम सॉकर चे संस्थापक विजय बारसे * प्रशिक्षक यांची भूमिका निभावली व प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक- नागराज मंजुळे द्वारा दिग्दर्शित आहे. अशा   * "झुंड" * सिनेमा ज्यांच्या जीवनपट हिंदी पिक्चर यामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे असे प्रसिद्ध फुटबॉल कोच माननीय * श्री.विजय बोरसे साहेब * यांनी  आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा मंगरूळ चव्हाळा येथे सदिच्छा भेट दिले. या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल या खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रश्नचिन्हाच्या विद्यार्थ्यांना 20 फुटबॉल दिले व  खेळा विषयी माहिती देऊन नविन युवा फुटबॉल पटु व्हावे करता सुभेच्छा दिल्या.

आश्रमशाळेची गडकरींनी घेतली दखल - दैनिक सकाळ विदर्भ ०७/०१/०२२

Image

प्रतिकात्मक रस्त्यावर शाळा भरो आंदोलनानंतर प्रश्नचिन्हाच्या विद्यार्थी पालक कृती समितीची नागपूर येथे पत्रकार परिषद ०४/०१/२०२२.

Image

नागपूर येथील नितीन गडकरी यांच्या घरासमोर प्रश्नचिन्हच्या विद्यार्थी पालकांचे आंदोलन.

Image

गडकरी म्हणाले, ‘हा’ राज्य सरकारचा विषय, केंद्राचा असता तर मी आत्ता निर्णय घेतला असता..

Image
गडकरी म्हणाले, ‘हा’ राज्य सरकारचा विषय, केंद्राचा असता तर मी आत्ता निर्णय घेतला असता.. चिमुकले विद्यार्थी आणि पालक सरसावले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना गळ घालण्यासाठी काल त्यांच्या घरासमोर ‘रस्त्यावरची शाळा’ भरवत अभिनव आंदोलन केले. सरकारनामा नागपूर : फासेपारधी समाजातील एक युवक शासकीय नोकरी सोडून आपल्या समाजातील मुलांना शिकविण्यासाठी सरसावतो. जिवाची बाजी लावून एक आश्रमशाळा उभी करतो आणि समृद्धी महामार्गाच्या कामात त्या शाळेची तोडफोड होते. मग त्या शाळेसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरतात अन् चक्क केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांच्या  नागपूरातील (Nagpur)  घरासमोर रस्त्यावरच शाळा भरवतात. खुद्द गडकरी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकतात. हा प्रसंग काल नागपूरकरांनी अनुभवला. समृद्धी महामार्गात तोडलेली आश्रमशाळा पुन्हा नव्या वास्तूसह सज्ज व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी ‘जी जान से’ प्रयत्न केले. परंतु मायबाप सरकारसाठी हा ‘चिल्लर’ विषय. ‘हो’ म्हणूनही कुणीच काहीही न केल्याने हतबल झालेल्या मती...

गडकरी यांच्या निवासस्थानी प्रश्नचिन्हाची प्रतिकात्मक शाळा भरवली.

Image