तहसीलदार पी.झेड .भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत प्रश्नचिन्हाच्या मागणींवर चर्चा

मा. पि.झेड. भोसले साहेब (तहसीलदार नांदगाव खंडेश्वर,अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत  संस्थापक अध्यक्ष श्री मतीन भोसले व माध्यमिक मुख्याध्यापक श्री प्रशांत गोरामन सर सह आदिवासी फासेपारधी सुधार समिती चे पदाधिकारी सोबत बैठक पार पडली.


आज दि १२/१२/२०१९ ला संध्याकाळी  प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा येथे ' संमृध्दी महामार्ग निर्मिती मुळे उपस्थित झालेल्या प्रश्नांवर मा. पी. झेड. भोसले साहेब (तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर) यांच्या अध्यक्षतेखाली  प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मतिनजी भोसले व माध्यमिक मुख्याध्यापक श्री प्रशांत गोरामन सर सह आदिवासी फासेपारधी सुधार समिती चे पदाधिकारी सोबत  खालिल मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.-
१)जमिन मागणीचा प्रस्ताव
२) वाचनालय इमारत
३) शौचालय इमारत
४) वर्ग खोल्या- ६
५) विहीरी -२, बोअरवेल -२
६)खेळाचे मैदान
७)विजेची डी.पी
८)ओट्यांचे बांधकाम,
९) वस्तुसंग्रहालय
१०)२५० झाडे कत्तल
११)रपटा / पुल
१२)सुरक्षा भिंत
१३) विहीरीची पाईप लाईन.

        यांपैकी संमृद्धी महामार्ग कंत्राटदार ने आत्ता पर्यंत ६ वर्गखोल्याचे बांधकाम सुरू केले होते ते अजुन ही अपुर्ण स्थितीत आहे. व खेळाचे मैदान सफाईचे काम सुद्धा अपुर्ण स्थितीत असल्याचे तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आणून दिले.
उद्या जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांच्याशी प्रश्नचिन्हांच्या  समस्यावर वरीष्ठ अधिकारी बैठक असुन त्या बैठकीत आपण सदर मुद्दे मांडून  शासन सकारात्मक प्रतिसाद देतील अशी हमी दिली.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .