शिक्षणाचे ' फासे' पारधी प्रश्नचिन्हाची व्यथा - जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रसारीत



*" शिक्षणाचे 'फासे ' पारधी - 
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रसारीत


समृद्धी हायवे महाराष्ट्राला स़मृध्द करतोय पण वंचित निराधार अनाथ बेसाहारा भिक मागणार्या आदिवासी फासेपारधी समाजाच्या ४५० मुलांना शिक्षण प्रवाहात आणणारे मतीन भोसले यांच्या *प्रश्नचिन्ह आश्रमशाळा* प्रकल्पावर मात्र अमावस्येच्या चंद्रग्रहण  झाल्याचे दिसते आहे.
सरकारने संमृद्धी महामार्गासाठी लोकांची जमिनी अधिग्रहण करत त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च केले पण सर्व शिक्षा अभियान व बालकांना मोफत सक्तीचे शिक्षणाचा अधिकार देणारया घटनेची पायमल्ली करत अथक परीश्रमातून व लोकवर्गनीतून निर्माण झालेल्या " प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा " ला उध्वस्त करण्याचा कदाचित मानस शासन प्रशासन करतोय की काय असेच दिसतेय.
फडणवीस सरकारने प्रश्नचिन्हास सामाजिक दायित्व व संमृध्दी महामार्गात आश्रमशाळा जात असल्याने भरपाई करून शाळेचे पुनर्वसन करू व त्या साठी लागणारी पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले पण सरकार गेल व सरकाने दिलेल्या आश्वासनाकडे शासनाने पाठ फिरवली असल्याचे दिसते.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .