Posts

विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा / विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा

Image
विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा /  विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा प्रतिनिधी Sep 30, 2015, 04:05 PM IST अमरावती - आश्रमशाळेतील विविध समस्यांना घेऊन फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आज (२९ सप्टेंबर) शाळा भरवली. शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागल्याचे फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी त्यांच्या कक्षातून खाली येत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील आदिवासी फासेपारधी सुधार समितीमार्फत प्रश्नचिन्ह आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळेला १८ जुलै २०१४ च्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत आश्रमशाळेत ४४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत ते १० वर्ग असून, शिक्षण घेण्यासाठी इमारत न...

प्रश्नचिन्ह’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण अमरावती जिल्हा कचेरीत

Image
प्रश्नचिन्ह’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, July 13, 2019 1:42am आदिवासी फासेपारधी सुधार समितीच्या मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गासाठी उद्ध्वत करण्यात आल्यानंतर शाळेतील मुलांचे हाल सुरू आहेत.  संदर्भ-  लोकमतन्यूज नेटवर्क अमरावती : आदिवासी फासेपारधी सुधार समितीच्या मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गासाठी उद्ध्वत करण्यात आल्यानंतर शाळेतील मुलांचे हाल सुरू आहेत. संरक्षणभिंतीचा अभाव आणि पाण्याचे दुर्भीक्ष यामुळे विद्यार्थ्यांसमोर संकटे निर्माण झाली असून, आपल्या विविध मागण्यांसाठी शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांच्यासह पदाधिकारी व  विद्यार्थ्यांनी जिल्हा कचेरीत शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. समितीच्या अर्धा एकर मालकीच्या शेतामधूनदेखील समृद्धी महामार्गाचा काही भाग गेला असून, संस्थेच्या मालकीची जागा संपादित करण्यापूर्वी लेखी नोटीसदेखील देण्यात आली नाही. एक एकराच्या जमिनीवर शैक्षणिक प्रकल्प उभा करण्यासाठी पक्के बांधकाम करण्यात आले होते. हे संपूर्ण बांधकाम उदध्वस्त करण्य...

आदिवासी आश्रमशाळा देऊन तत्कालीन काँग्रेस शासनाकडून फासेपारधींची फसवणूक -लोकसत्ता वृत्तपत्रात बातमी प्रकाशित २०१५

Image
आदिवासी आश्रमशाळा देऊन तत्कालीन काँग्रेस शासनाकडून फासेपारधींची फसवणूक आश्रमशाळेमुळे आमच्या समस्यांमध्ये भरच पडली आहे, असा आरोप मतीन भोसले यांनी केला. रत्नाकर पवार  |प्रतिनिधी, नागपूर | Published on: November 27, 2015 4 सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांच्या आग्रहास्तव तत्कालीन मंत्री बबन पाचपुते यांनी फासेपारधी मुलांसाठी नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड तालुक्यातील आश्रमशाळा अमरावती जिल्ह्य़ातील मंगरुळ चवाळा या गावी देऊ केली. मात्र, या शाळेने तात्पुरत्या शिक्षणाचा दिलासा दिला असला तरी अनेक प्रश्न निर्माण केल्याने काँग्रेस शासनाने एकप्रकारे फासेपारधी बांधवांची फसवणूक केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आश्रमशाळेमुळे आमच्या समस्यांमध्ये भरच पडली आहे, असा आरोप मतीन भोसले यांनी केला. एक रुपयाची भीक मागून उभ्या केलेल्या ‘प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळे’ने फासेपारधी मुलांच्या जीवनात शिक्षणाने बहर आणण्याऐवजी आणखीनच समस्या वाढवली आहे. अनाथ, एकच पालक असलेले आणि राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात चोरीच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्यांच्या विशेष मुलांची ही शाळा आहे. यासाठी शासनाने गांभीर्...

दानवीर सलामत राहो.!

Image
दानवीर सलामत राहो! August 11, 2018, 8:32 PM IST   मतीन भोसले   in   प्रश्नव्यूह | सामाजिक ,   शिक्षण ,   भाषा-संस्कृती ४५० फासेपारधी बालकांचा पोशिंदा असलेला हा मतीन भोसले मात्र त्यांच्याच जबाबदारीपोटी लोकांकडे सतत भीक मागतो. मानवतेचे पूजारी असलेले दानदाते फुल ना फुलाची पाकळी का होईना, या बालकांना देतात. दानवीरांमुळे ४५० विद्यार्थ्यांचा दोन वेळच्या जेवणाचा खर्च भागवला जातो. फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी ‘प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा’ उभारली. शाळेला ‘प्रश्नचिन्ह’ हे नाव देण्यामागचे कारण म्हणजे, समाजाचे व बालकांचे फार मोठे प्रश्न असणे. वाट्याला आलेले अठराविश्वे दारिद्र्य, अशिक्षितपणाचा शाप, समाजाला लागलेला चोर जातीचा कलंक, असे एकापेक्षा एक अनेक गंभीर प्रश्न! असे सर्व प्रश्नच प्रश्न असल्याने शाळेला ‘प्रश्नचिन्ह’ नाव दिले. समाजाला या सर्व प्रश्नांतून सावरण्यासाठी शिक्षण घेऊन समाज ज्ञानी व्हावा, या उद्देशांनीच ही शाळा उभारली. परंतु, या शाळेत शिकणारे सगळे विद्यार्थी भंगार वेचणारे, शिकार करणारे, भीक मागणारे असेच आहेत. त्यामुळे त्यांच्या भंगार वेचण्याने...

प्रश्नचिन्ह चे मनोगत

Image
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे संस्थापक श्री.मतीनजी भोसले यांचे मनोगत गेल्या दोन-चार दिवसांत तरी कुठं पंगत झाली असेल का? कारण पंगतीतलं उष्ट अन्न लोकं उकिरड्यावर फेकून देतात. माझ्या आईनं ते उचलून आणावं आणि आम्हास खाऊ घालावं. ते नासलेले अन्न वाळवून आईने आम्हास घालावं, असे जगलो आम्ही… जवळपास आता १४-१५ वर्षे झालीत, मी या ‘प्रश्नचिन्हा’त आहे. उशिराने का होईना, माझ्या या प्रकल्पकार्याची माहिती लोकांना हळूहळू होत आहे. अत्यंत दारिद्र्यात असलेल्या फासेपारध्यांच्या मुलांसाठी मी काहीतरी करू शकेल, असा विश्वास वाटतो. फासेपारधी विद्यार्थ्यांच्या विद्यादानासाठी मी धडपडतोय. वास्तविक, मी जगावेगळे काही करतोय, असे नाही. परंतु माझ्याबाबतीत म्हणाल तर, फासेपारध्यांसाठी केवळ मीच हे कार्य करतो आहे. माझा समाज शिक्षणापासून कोसोदूर आहे. तो सुधारित गावसमाजापासून आजही फटकूनच राहतो. गावातील सुधारित लोकं, त्यांच्या सुधारित चालीरीती आणि उघडबंब पारधी, यांच्यात मेळ कसा बसणार? गावातली शाळा कोण शिकणार? शक्यच नाही! म्हणूनच तर फासेपारधी समाजाची खूप दैनावस्था आहे. आज फासेपारधी समाज विविध महानगरांत भीक मागत फि...

अधिकार्यांनी हिसकावला २५० विद्यार्थ्यांच्या तोंडाचा घास

Image

आदिवासी फासेपारधी समाजिल मुलांचे प्रश्नचिन्ह..!

Image