मेधाताई पाटकर यांचा प्रमुख उपस्थित प्रश्नचिन्हाचा १० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचा १० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या मा. मेधाताई पाटकर (जेष्ठ समाजसेविका), कार्यक्रमाचे उद्घाटक- मा.श्री. कपिल पाटील साहेब ( आमदार, विधानपरिषद सदस्य), कार्यक्रमाचे अध्यक्ष- मा.श्री. पन्नालाल सुराणा ( माजी अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र प्रदेश) विशेष अतिथी - मा.श्री. सत्यपाल महाराज ( जेष्ठ प्रबोधनकार), मा.श्री. संदिप  पाल महाराज (प्रसिद्ध प्रबोधनकार), मा.श्री. अतुल देशमुख(महासचिव-राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र), मा.श्री. पाचारने साहेब ( आयुक्त, राज्य कर ) , मा.श्री.अजय किंगरे ( अध्यक्ष-मैत्री मांदियाळी प्रतिष्ठाण, जालना), ऍड. सुधिर तायडे ( अध्यक्ष - ब्ल्यु टायगर फोर्स), मा.श्री. बबनजी गोरामन ( राष्ट्रीय महासचिव- अखिल भारतीय आदिम महासंघ'), मा.श्री. नामदेव भोसले ( आदिवासी सेवक पुरस्कृत, महाराष्ट्र राज्य)सह इतर विशेष अतिथी उपस्थित होते.
          कार्यक्रमाच्या शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत हे शाल-श्रीफळ सह रोपटे देऊन करण्यात आले.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .