मा. आयुक्त साहेब आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याशी आदिवासी फासेपारधी समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांवर फासेपारधी शिष्टमंडळाची मतिन भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सविस्तर चर्चा.
आज दि.२६/०२/२०२१ ला मा.आयुक्त साहेब आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्यासोबत श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष - श्री. मतिनजी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आदिवासी फासेपारधी समाजाच्या शिष्टमंडळाची आदिवासी फासेपारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा २० मुद्दांवर सखोल चर्चा मा. आयुक्त साहेब यांच्याशी करण्यात आली.
बैठकीत मा. आयुक्त साहेब यांनी आदिवासी फासेपारधी समाजाच्या उत्थानासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू व समाजाच्या उन्नतीसाठी विशेष उपक्रम राबविणार तसेच निवेदन पत्रात मांडलेल्या मुद्दांवर व्ययक्तिक रित्या लक्ष्य देण्याचे आश्वासन सदर बैठकीत देण्यात आले.
Comments
Post a Comment