न्यायालय न्यायप्रविष्ट खटला असताना 'प्रश्नचिन्ह' ची विहीरत मुरूम डीझेल टाकून बुजविण्याचा संमृद्धी महामार्ग कंत्राटदाराचा अमानवीय डाव कार्यकर्त्यांनी उधळला.

 दि ०४/०१/२०२१ ला मध्यरात्री प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा ता नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या आदिवासी फासेपारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी उभारलेला प्रकल्प जो की महाराष्ट्र राज्याचा महत्त्वकांक्षी संमृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे उद्धवस्त करत २ एकर जमिन अनधिकृतपणे संमृद्धी प्रकल्प कंत्राटदाराने ताब्यात घेतला ज्यामुळे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा च्या ६ प्रशस्त वर्गखोल्या, वाचनालय, मुलींचे स्नानगृह सहीत उद्धवस्त करण्यात आले होते. असे असताना कसे बसे  प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थींसाठी टिशपत्राची वर्गखोल्या करून ज्ञानदानाचे कार्य सुरु आहे. परंतु  संमृद्धी महामार्गाच्या मधोमध प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या मालकीची विहीर येत असल्याचे त्या संबंधित अमरावती जिल्हा न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट असुन देखील ४/०५/२०२१ ला संमृद्धी महामार्गाचे कंत्राटदाराने सुचना देऊन सुमारे ३० ते ३५  शिपाई व कामगारांनी जे.सी.बी व बुलडोझर ने पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असलेल्या व प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळाच्या मालकीच्या विहीर मुरूम टाकून व पाईप लाईन व मोटार काढून डीझेल- मुरून ने विहीर बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
   ही घटना लक्ष्यात येता घटना स्थळी जाऊन विहीर संबंधित खटला न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे विहीर बुजविण्याचा विरोध करण्यात आला. तेव्हा जेसीबी चालक व ट्रक चालकाने विरोध करणारे आदिवासी फासेपारधी महीला व बांधवांवर गाडी चढविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सदर घटना ही प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री मतीन भोसले यांच्या अनुपस्थितीत घटल्याने त्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती व पोलिस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामिण यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन आदिवासी फासेपारधी समाजाच्या आश्रमशाळेच्या एकमेव विहीरीचे  पिण्याचे पाणी दुषित करणे या संदर्भात अॅट्रोसीटी कायदा अंतर्गत आरोपींवर कारवाई करणे व न्यायप्रविष्ट खटला असताना न्यायालयाची अवमानना करून विहीर बुजविण्याचा प्रयत्न करणे, याबाबत आरोपी संमृद्धी महामार्ग कंत्राटदार व कामगार, शिपाई यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी या संबंधीत निवेदन देण्यात आले.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .