कोरोना योद्धा- मतिन भोसले , कोरोनाच्या प्रश्नचिन्हाला मतिनचे उत्तर !
कोरोना योद्धा- मतिन भोसले
https://youtu.be/FY6lzM9jbyo
कोरोना योद्धा - मतिन भोसले
२३ मार्च जेव्हा शासनाने सर्वत्र लॉकडाऊन लावले संचारबंदी लागू केली तेव्हा मतिनच्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत ४७१ मुले होती. ती मुले या संचारबंदी मुळे बंदीस्त झाली होती. आता शाळेला अन्नधान्य मिळणे संचारबंदी मुळे थांबले होते, लेकरांना त्यांच्या घरी कसे पाठवावे ? प्रवास कसा करावा ? प्रवासाचा खर्च कसा मॅनेज करावा ? असे असंख्य प्रश्न मतिनवर उभे राहिले त्या परीस्थितीत प्रकाश काका आमटे, विकास काका आमटे व जालन्याची अजयभाऊ कींगरे यांची 'मैत्री मांदीयाळी' या संस्थेची मदत झाले त्यामुळे मुलांना आपल्या गावी सोडण्यात सहकार्य लाभले.
असे असताना ज्या मुलांने आई-बाबा नाहीत अनाथ बेसाहारा आहेत असे ३१ मुलं त्यांचे मात्र पालकत्व मतिनने स्विकारले व त्यांना लॉकडाऊन मध्ये शाळेतच राहण्याची जेवण्याची सोय केली. परंतु शासनाला शाळेत राशन नाही शाळेची परीस्थिती बिकट झाली आहे, प्रश्नचिन्हाला संचारबंदीचा फटका बसला आहे याची माहिती असतानाही शासनाने मतिनच्या प्रश्नचिन्हाला केराची टोपली दाखवत एक मुठ तांदूळ व गहू सुद्धा दिले नाही. यामुळे नाहक मतिनला संचारबंदीचा खुप त्रास सहन करावा लागला.
शासनाने लॉकडाऊन मध्ये सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आप आपल्या गावी सोडण्यासाठी सुचना केल्या परंतु एक रूपयाचीही शासनाने मदत यावेळी प्रश्नचिन्हाला केली नाही ज्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडले जावू शकते त्यांची सोय होऊ शकते.
या लॉकडाऊन मध्ये मतिनच्या पुढाकाराने जंगलात, रानावनात, गावा बाहेर बेड्या पाड्यांवर लॉकडाऊन मुळे जो जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न सोडविण्यासाठी लोकवर्गणी करून अन्नधान्य कीट तयार करून प्रत्येक फासेपारधी बेड्यावर जाऊन धान्य कीट वितरण केले ज्यामुळे आपल्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही व त्यांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य मोफत मिळेल.
Comments
Post a Comment