प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत परिनिर्वाण साजरा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमकार पवार सर व माध्यमिक मुख्याध्यापक श्री प्रशांत गोरामन सर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साबळे सर यांनी केले तर प्रशांत गोरामन सर यांनी अध्यक्ष भाषण करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय काळबांडे सरांनी केले याप्रसंगी प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील मुलांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून अभिवादन केले.
Comments
Post a Comment