प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला सरकारने समृद्धी हायवे चे काम राखुन ठेवल्याच्या कारणाने तब्बल ७८ लक्षाचा दंड ठोठावला


मतीन भोसले यांच्या *प्रश्नचिन्ह आश्रमशाळा* वर  सरकारने *समृद्धी हायवे* चे काम राखुन ठेवल्याच्या कारणाने तब्बल *७५ लक्ष* रूपयांचा दंड ठोठावला.

*मतीन भोसले* यांच्या अथक प्रयत्नातुन *भिक मागो ,रास्ता रोको, प्रशासकीय कार्यालयी ठिय्या आंदोलनातून* असे अगणित आंदोलने करत _दारोदारी हिंडून आपल्या ४७१  आदिवासी वंचित  पाकीटमारी करणारे, रेल्वे स्टेशन बस स्थानक वर  भिक मागणारे, निराधार अनाथ बेसाहारा वंचित  फासेपारधी समाजाच्या बालकांना_ मोफत शिक्षण मिळावे यासाठी देशातील एकमेव प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा सुरू करून शासनाच्या सक्तीच शिक्षण देण्याचा निर्णयावर ते स्व:ता  दारोदारी भिक मागून शिकवत अंमलबजावणी करतात पण  आजही सरकारची प्रश्नचिन्ह आश्रमशाळेप्रती भुमिका स्पष्ठ नाही.
मतीनच्या अविरत संघर्षातुन निर्माण झालेल्या टिन पत्र्याच्या शेड व काही दानशुरांच्या मदतीने बांधण्यात आलेल्या इमारतीवर सरकारची तिरपी नजर असल्याचे दिसते.

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .